आपण आपली रोग प्रतिकार शक्ती असे वाढवू शकता
आपण सतत आजारी पडत आहात का ? |
थोडक्यात, आजारी पडने म्हणजे आपल्या शरीरात किटाणूची ची एन्ट्री होणे,आणि ह्या सूक्ष्मजीवांशी लढा करणारी शक्ती म्हणजे आपल्या शरीरात असणारी रोग प्रतिकारक शक्ती. जर आपण सातत्याने आजारी पडत आहात तर नक्कीच तुमची रोग प्रतिकार शक्ती हि सामान्य माणसा पेक्षा कमी आहे. परंतु आपली प्रतिकार शक्ती कमी आहे म्हणून घाबरुन जायची गरज नाही. आपण हि शक्ती वाढवू शकता. तर मग जाणून घेऊयात काही अत्यंत महत्वाच्या गोष्टी.
रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी आपला पहिला उत्तम मार्ग म्हणजे निरोगी जीवन शैली आत्मसात करणे, सर्वसाधारण आरोग्य तत्वांचे नियमित पालन करणे आहे. तर मग जाणून घेऊयात हे तथ्य.
- नियमित व्यायाम करा.
- फळे आणि भाजीपाला यांचा आहारात जास्त समावेश करा.
- धूम्रपान करू नका.
- वजनाचे संतुलन राखा.
- अल्कोहोल होईल तितकं टाळायचं प्रयत्न करा.
- पुरेशी झोप घ्या.
- वारंवार हात धुवा आणि स्वच्छ कपडे घाला .
- मनावरचा ताण कमी करण्याचा प्रयत्न करा.
- आपल्या आजू बाजूचे परिसर स्वच्छ ठेवा.
नक्कीच ह्या सर्व गोष्टी चे पालन करून आपण आपली रोगप्रतिकार शक्ती वाढवू शकता आणि आजाराला आपल्या पासून चार हात लांब ठेवू शकता. शेवटी आपण आपल्या शरीरासाठी इतके तर करूच शकता ना?
हि माहिती नक्कीच तुम्हाला आवडली असेल आणि आवडली असेल तर नक्कीच लाईक करा आणि इतरांना सोबत शेयर करा.
धन्यवाद....
Post a Comment