BREAKING NEWS

Recent

Friday, April 10, 2020

आयफोन 9 / आयफोन एसई 2 15 एप्रिल रोजी लाँच!

Apple आपले नवीन फोन मॉडेल  लवकरच मार्केट मध्ये आणनार आहे, अफवा आहे कि तो फोन आयफोन 9 / आयफोन एसई २ या नावाने ओळखला जाईल तसेच Apple त्याला 15 एप्रिल रोजी लाँच करेल. चला तर मग जाणून घेऊयात आता पर्यंत माहित असलेले त्याचे स्पेसिफिकेशन्स, किंमत, आणि बरेच काही.

apple 9


हा फोन आयफोन 9 ,आयफोन एसई 2, ह्या नावाने ओळखला जाऊ शकतो किंवा अ‍ॅपल त्यास फक्त आयफोन एसई (२०२० ) हि  म्हणू शकतो , अशी माहिती  निर्मात्यांनी दिली आहे

Apple आयफोन 9  अंतर्गत एक नव्हे तर दोन फोन लॉन्च करू शकतो, असा अंदाज वर्तविला जात आहे. आयफोन 9 ची स्क्रीन कदाचित 4.7 इंच असेल आणि आयफोन 9 प्लस 5.4-इंच स्क्रीनसह येऊ शकेल.

आयफोन 9 उर्फ आयफोन एसई ची किंमत सुमारे 399 डॉलर इतकी आहे, ती अंदाजे 30,000 रुपये आहे पण जसे कि आपल्याला माहित आहे apple डायरेक्ट  डॉलर ला रुपये मध्ये करत नाही त्यामुळे त्याचा रेट वाढतो . याचा अर्थ आयफोन 9 ची जागतिक किंमत $ 399 असल्यास भारतात फोनची किंमत सुमारे 36,000 ते 40,000 रुपयांपर्यंत असू शकते. तरीही या किंमतीवर, आयफोन 9 ने सॅमसंग, वनप्लस आणि इतरांच्या आव्हानांना आव्हान देण्याची अपेक्षा करता येईल.

रिपोर्टनुसार, आयफोन ९ मध्ये ६४ GB , १२८ GB आणि २६६GB या तीन स्टोरेजचे  प्रकार आहेत. आयफोन 9 मध्ये A 13 बायोनिक चिप आहे. A 13 हे Appleचे नवीनतम चिपसेट आहे, जे आयफोन 11, आयफोन 11 प्रो आणि आयफोन 11 प्रो मॅक्स सारख्या Appleच्या नवीनतम मालिकेमध्ये आढळते. याचा अर्थ असा की आयफोन 9 हा एक अतिशय वेगवान फोन असणार आहे.

कॅमेर्‍याच्या बाबतीत, Apple आयफोन ९, ड्युअल आणि ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप असलेल्या आयफोनची नवीनतम मालिकेच्या विपरीत 12 मेगापिक्सलचा सिंगल रियर कॅमेरा अनु शकतो.

जर आयफोन 9 च्या दिसण्या बद्दल बोलायचं म्हणल्यास आयफोन 9 हा दिसण्या मध्ये Appleचे आधीच्या आयफोन ७, आयफोन ८ सारखाच असेल. आयफोन ९ मध्ये 7.7 इंचाचा एलसीडी डिस्प्ले असण्याची आणि टच आयडी परत आणन्याची अफवा पसरली आहे.

तर मित्रांनो कशी वाटली आपल्या नवीन आयफोनची माहिती  नक्कीच कळवा  बर का...



धन्यवाद... 

Share this:

Post a Comment

 
Copyright © 2014 गोंधळ. Template Designed by OddThemes - Videopiar