न्यूयॉर्क मध्ये ब्रॉन्क्स प्राणिसंग्रहालया मध्ये नादिया नावाची वाघीण आणि ६ इतर वाघ आजारी पडले होते. ब्रॉन्क्स प्राणिसंग्रहाल हा १६ मार्च पासून जाणतेसाठी बंद करण्यात आले होते, सर्वप्रथम नादिया मध्ये २७ मार्च पासून लक्षणे दिसायला सुरवात झाली आणि तिला कोरड्या खोकल्याचा त्रास सुरूझाला.न्यूयॉर्क शहरातील ब्रॉन्क्स प्राणिसंग्रहालय म्हणतात की कोरोना टेस्टची पुष्टी आयोवामधील राष्ट्रीय पशुवैद्यकीय सेवा प्रयोगशाळेने केली आहे.एखाद्या प्राण्यामध्ये करोनाचे लक्षणे दिसन्याचा हा प्रथम ज्ञात प्रकरण असल्याचे समजते.
पण प्रश्न पडतो कि नादिया पर्यंत हा विषाणू गेला तरी कसा ? ह्या गोष्टीचा शहानिशा केल्या नंतर असे आढळून आले की प्राणिसंग्रहालया मध्ये काम करणारा कामगार नादिया च्या संपर्कात लक्षणे विकसित होण्यापूर्वी आला होता ज्यामुळे हि महामारी नादिया पर्यंत पोचली.
प्राणिसंग्रहालयात प्रमुख पशुवैद्य पॉल कॅले यांनी रविवारी रॉयटर्स वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलेकी एखाद्या व्यक्तीमुले एखाद्या प्राण्याला लागण झाले आणि प्राणी आजारी पडले हेजगात जगात प्रथमच घडले आहे.
US कृषी विभागाणे आपल्या वेबसाइट वर म्हणले आहे कि "आजारी असलेल्या लोकांनी विषाणूबद्दल अधिक माहिती होईपर्यंत प्राण्यांशी कमीत कमी संपर्क साधण्याची सूचना केली आहे."
मार्चच्या शेवटच्या आठवड्यात बेल्जियममध्ये कोरोनाव्हायरसची लागण एका पाळीव मांजरीला झाल्याचे दिसून आले.
त्यानंतर हाँगकाँगमध्ये मध्ये दोन कुत्र्यांची सकारात्मक चाचणी घेण्यात आली.असे मानले जाते की या सर्व प्राण्यांना त्यांच्याबरोबर राहणाऱ्या कोरोना ग्रस्त लोकांकडून विषाणूचा संसर्ग झाला आहे.
तरी आपण विषाणूबद्दल अधिक माहिती होईपर्यंत प्राण्यांशी कमीत कमी संपर्क केलेलं बर असे वाटते.
धन्यवाद ...
Informative post
ReplyDelete