पुण्यात कोरोना विषाणूच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. ह्या गोष्टीची जबाबदारी घेऊन लाखो लोक आपल्याच घरीच लॉकडाऊन आहेत, तरी काही लोक आपल्या घरातून बाहेर पडतच आहेत.
अशीच एक घटना पुण्यातील स्वारगेट परिसर घटली आहे, लॉकडाऊन नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल पुण्यातील स्वारगेट परिसरात गुरुवारी तब्बल १८० लोकांना चार तास बसून राहण्याची शिक्षा पोलिसांनी दिली आहे.
शब्बीर सय्यद, (पोलिस निरीक्षक स्वारगेट) ह्या गोष्टीबद्दल बोलताना सांगितले कि पुण्यातील स्वारगेट परिसरामध्ये एकूण १८० लोकांना रस्त्यावर चार तास बसून राहण्याची शिक्षा देण्यात अली आहे, कारण कोरोनाविषाणूचा प्रसार थांबवण्यासाठी लॉकडाउनचे नियमांचा पालन करणे अतिशय गरजेचे आहे.
वारंवार सांगूनहि लोक नियमांचा उल्लंघन केल्यामुळे हि शिक्षा देण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले की या लोकांना त्यांच्या गंभीर परिस्थितीची जाणीव करुन देण्यासाठी बसवले गेले होते आणि त्यांना उद्भवू शकणारा धोक्याची जाणीव करून देण्यासाठी त्यांना बसवण्यात आले होते.
पुण्यात कोरोनाव्हायरसच्या संख्येत सातत्याने वाढ होत असली तरी हे लोक बेजबाबदार आहेत. आयपीसी कलम १88 अन्वये आतापर्यंत सुमारे ५० गुन्हे दाखल झाले आहेत आणि त्यांच्या वाहनांनाही ताब्यात घेण्यात आले आहे, असे सय्यद यांनी सांगितले.
Post a Comment