BREAKING NEWS

Recent

Tuesday, April 14, 2020

लॉकडाउन असताना पण ह्या कारणामुळे २० लिटर उंटांचे दूध राजस्थान वरून मुंबईला रेल्वेने तात्काळ पाठवण्यात आले.


Indian-Railway-Camel-Milk-Transport
INDIAN RAILWAY

बकरी, गाय आणि म्हशीच्या दुधापासून ऐलर्जी असलेल्या आपल्या साडेतीन वर्षाच्या ऑटिस्टिक मुलासाठी एक  मुंबईची महिला उंटांचे दूधाचा वापर करत होती. लॉकडाउन च्या काळात आपल्याला साधे दूध पण भेटणे अवघड आहे अश्या परिस्थितीत आपल्या साडेतीन वर्षाच्या मुलासाठी उंटांचे दूध कसे आणायचे? अश्या परिथितीत त्या महिलेने ट्विटरवर हा प्रश्न ट्विट केला ज्यात तिने आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही  टॅग केलं होत.

त्या महिलेने केलेला ट्विट असा होता " सर माझा  साडेतीन वर्षांचचा मूल आहे ज्याला ऑटिझम आणि अन्नाची तीव्र ऐलर्जी आहे. तो उंटांच्या दुधावर आणि डाळींच्या मर्यादित आहारा वर जगतो. जेव्हा लॉकडाउन सुरू झाला तेव्हा माझ्याकडे काही दिवस पुरेल इतकेच उंटाचे दूध उरले होते. उंटांचे दूध किंवा त्याचे पाउडर सादरी (राजस्थान) मधून घेण्यास मला मदत करा.

महिलेने ट्विट केल्यानंतर रेल्वेने 20 लिटर उंटांचे दूध मुंबईतील तिच्या कुटुंबात पोहोचवले.

शनिवारी रेल्वेचे हे चांगले कृत्य उघडकीस  तेव्हा आले जेव्हा वरिष्ठ आयपीएस अधिकारी अरुण बोथरा यांनी याबद्दल ट्विट केले. ते आपल्या ट्विट मध्ये म्हणतात कि " काल रात्री 20 लिटर उंटांचे दूध रेल्वेने मुंबईला त्या कुटुंबा पर्यंत पोहोचवले आहे . त्या कुटुंबाने शहरातील दुसऱ्या गरजू व्यक्तीशी दयाळूपणे दूध वाटले आहे".




राजस्थानातील उंट दुधाच्या उत्पादनांचा पहिला ब्रँड अ‍ॅडडिक फूड्सचा संपर्क साधणार्‍या बोथरा यांच्यासहित ट्विटरवर देशभरातील लोकांनी अनेक सल्ले सुचवले, कंपनीने आपल्या उंट दुधाची पावडर मुलासाठी देऊ केली. मात्र, ते मुंबईला कसे पाठवायचे हा एक खूप मोठा प्रश्न होता.

बोथरा यांनी ट्विट केल्या नंतर हा प्रश्न उत्तर पश्चिम रेल्वे (एनडब्ल्यूआर) चे व्यवस्थापक तरुण जैन यानी  कढाले 
त्यांनी लुधियाना ते मुंबई दरम्यान धावणाऱ्यापार्सल कार्गो ट्रेन क्र. ००९०२,   राजस्थानमधील फलना स्थानकात थांबत नसली तरी थांबवले आणि पॅकेज फालना येथून उचलायला लावले आणि मुंबईतील महिले पर्यंत  पोहचवले.

आमच्या (एनडब्ल्यूआर) गाड्या देशातील १८ जिल्ह्यांत धावतात आणि लोकांना मदत करण्यासाठी जे काही आवश्यक आहे ते आम्ही करू, 'असे तरुण जैन म्हणतात.


Share this:

Post a Comment

 
Copyright © 2014 गोंधळ. Template Designed by OddThemes - Videopiar