BREAKING NEWS

Recent

Wednesday, April 8, 2020

चक्क कोरोना मुळे करावे लागले व्हॉट्सअ‍ॅप मध्ये हे बदल.

             मित्रांनो,तुम्हाला माहित असेलच कि फेसबुकने व्हॉट्सअ‍ॅपला विकत घेतले आहे. व्हॉट्सअ‍ॅपची स्थापना ब्रायन अ‍ॅक्टन आणि जान कौम यांनी २००९ मध्ये केली होती.  त्यानंतर हा अ‍ॅप अत्यंत वेगाने विकसित झाला आणि फारच कमी वेळेत तो खूप लोकप्रिय पण झाला आणि जगभरातील कोट्यावधी लोक हे अ‍ॅप आज आपल्या स्मार्ट फोने मध्ये वापरतात, फक्त भारतातच याचे दशलक्षापेक्षा अधिक वापरकरते आहेत.








व्हॉट्सअ‍ॅपच्या लोकप्रियतेमागील मुख्य कारण म्हणजे याचा वापर करून एका स्मार्ट फोनवरून दुसर्‍या स्मार्ट फोनवर त्वरित मॅसेज, इमेज, व्हिडिओ, वापरकर्त्याचे स्थान आणि ऑडिओ मीडिया संदेश पाठवता येते . म्हणून मित्रांना किंवा इतर कोणालाही मॅसेजइमेज, व्हिडिओ इ. पाठविण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅप चा सर्रास वापर होतो. 

मग प्रश्न पडतो कि कॉरोनामुळे असे काय झाले कि व्हॉट्सअ‍ॅप मध्ये बदल घडवून आणावे लागले? आणि व्हाट्स अँप मध्ये कोणते कोणते बदल करण्यात आले? आणि त्यामुळे काय फरक पडतो?, चला तर मग जाणून घेऊयात आपल्या प्रश्नांची उत्तरे.


whats app updates

व्हॉट्सअ‍ॅप आता वारंवार फॉरवर्ड होणारे मेसेज एका वेळी एकाच व्यक्तीला फॉरवर्ड करायला परवानगी देणारआहे, हा बदल व्हाट्स अँप ने कोरोना बद्दल पसरत असलेल्या अफवांना थांबवण्यासाठी केलं आहे.
भारतासह खूप साऱ्या दुसऱ्या देशांनीही ह्या बदलला पाठिंबा दिला आहे, ज्यामुळे भन्नाट पसरत असेल्या अफवांना अढा घालणे खूप सोयीस्कर होणार आहे. 

फेसबुकच्या मालकीच्या व्हॉट्सअ‍ॅपने मंगळवारी आपल्या ब्लॉगमध्ये म्हटले आहे की "आम्ही आता व्हाट्स अँप मेसेज  फॉरवर्ड करण्यासाठी काही बंधने घालत आहोत. लॉक डाउन  च्या काळात आणि कॉरोनच्या प्रसारा नंतर व्हाट्स अँप मेसेज फॉरवर्ड करण्या मध्ये खूपच जास्त वाढ झाली आहे आणि अफवांनाही खूप गती भेटली आहे.

व्हाट्स अँप सारख्या सोसिअल नेटवर्कचा वापर सामाजिक अंतर ठेवण्यासाठी तर होतोय पण खूप सारे विदेशात अडकलेले लोक आपल्या परिवाराला संपर्क करण्यासाठी करत आहेत. 

"व्हाट्स अँपचा वापर हा वयक्तीक संपर्कासाठी करावा, नाहीकी अफवा पसरण्यासाठी" असे व्हाट्स अँप कंपनी ने म्हणले आहे.  नक्कीच ह्या निर्णया मुले अफवांना अढा बसेल अशी अपेक्षा आहे 



धन्यवाद...  







Share this:

Post a Comment

 
Copyright © 2014 गोंधळ. Template Designed by OddThemes - Videopiar