image source airindia.in/ |
करोना विषाणू मुले केलेल्या लॉकडाउन मुळे भारतात सर्वच ट्रान्सपोर्ट सोयी बंद करण्यात आल्या होत्या, पण आता परिस्थिती सुधारत असल्यामुळे २० एप्रिल नंतर काही निवडक व्यवसायांसाठी मुभा देण्यात अली आहे. पण लॉकडाउनच्या दुसऱ्या टप्प्यात २० एप्रिल नंतरही देशातील ट्रान्सपोर्ट सुविधा बंदच राहणार आहे.
कोरोनाव्हायरचा प्रसार रोखण्यासाठी 25 मार्चपासून भारतात लॉकडाऊन करण्यात आले आहे. लॉकडाऊनचा पहिला टप्पा 25 मार्च ते 14 एप्रिल दरम्यान होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 14 एप्रिल रोजी लॉकडाऊन 3 मे पर्यंत वाढविला.
पण नुकताच एअर इंडियाने सांगिले आहे कि लॉकडाउनचा दुसरा टप्पा संपल्यानंतर म्हणजेच ४ मे पासून देशांतर्गत काही निवडक मार्गांवर प्रवास करणे शक्य होणार आहे. ह्या निर्णयामुळे लॉकडाउनमध्ये अडकलेल्या लोकांमध्ये एक वेगळा आनंदाचा वातावरण निर्माण झाला आहे.
एअर इंडियाने “सध्या सुरू असलेल्या जागतिक आरोग्याच्या समस्येमुळे आम्ही सध्या३ मे २०२० पर्यंतच्या सर्व देशांतर्गत उड्डाणे आणि ३१ मे २०२० पर्यंत सर्व आंतरराष्ट्रीय विमानसेवेसाठी बुकिंग स्वीकारणे बंद केले आहे,” असे आपल्या वेबसाईट वर म्हणले आहे. तरी ह्या तारखेच्या नंतरच्या बुकिंग सुरू झाल्या आहेत.
४ मे पासून काही देशांतर्गत मार्गांवर बुकिंग सुरू केली आहे आणि आंतरराष्ट्रीय बुकिंग 1 जूनपासून सुरु असेल असेही एअर इंडिया ने सांगितले आहे.
Post a Comment