corona-virus |
चीनमधून आलेल्या कोरोना विषाणूचा थैमान संपूर्ण जगात पसरला आहे. सध्याची परिस्थिती पाहता संपुन जगात २३,५५,६७६ इतके लोक या विषाणूच्या संपर्कात आले आहेत. आणि १,६२,३२ लोक दगावले आहेत. भारतात या विषाणूचा प्रकोप पाहता विदेशा पेक्षा कमीच आहे तरीही १६,११६ इतक्या लोकांना भारतात ह्याची लागण झाली आहे, आणि ५१९ लोक मरण पावले आहेत.
वाढत्या संसर्गाला आळा घालण्यासाठी कोविड -१९ चा शोध घेण्यासाठी वापरण्यात येत असलेल्या तीन लाख रॅपिड अँटीबॉडी टेस्ट किट्स चीनच्या गुआंगझू येथून भारतात रवाना करण्यात आल्या आहेत.
राजस्थान आणि तमिळनाडू येथे सुमारे तीन लाख रॅपिड अँटीबॉडी चाचणी किट विमानात चीनच्या गुआंगझू येथून आणण्यात आल्या आहेत असे चीनमधील भारतीय राजदूत विक्रम मिस्री यांनी सांगितले आहे.
पुरेशा पुरवठ्यांची उपलब्धता व्हावी यासाठी भारत अलीकडील आठवड्यांत चीनकडून वैद्यकीय पुरवठा करीत आहे. या आठवड्याच्या सुरूवातीस चीनकडून ६.५ लाख अँटीबॉडी टेस्ट आणि आरएनए एक्सट्रॅक्शन किट्स आणल्या गेल्या आहेत.
रॅपिड अँटीबॉडी टेस्ट किट्स 15 मिनिटांत निकाल देतात आणि एखाद्या कोविड-१९ विषाणूचा धोका आहे का हे सांगण्यासाठी अनुनासिक स्व्यब ऐवजी रक्ताच्या नमुने वापरले जातात. आरएनए एक्सट्रॅक्शन किट टिशुमधून एकूण आरएनए काढण्यास मदत करते.
मंगळवारी मिश्री यांनी मीडियाला सांगितले की, भारताने कोविड -१९ रूग्णांवर उपचार करणार्या वैद्यकीय कर्मचार्यांसाठी १५० लाख वैयक्तिक संरक्षण गीअर आणि ३० लाख चाचणी किट चीनकडून खरेदी करण्याचे आदेश भारताने दिले आहे. चीनी सरकारच्या मदतीने बोना फिड कंपन्यांसह हे आदेश दिले जात आहेत.